• A
  • A
  • A
आबा असते तर डान्सबारविरोधी आंदोलन करण्याची वेळच आली नसती - स्मिता पाटील

पनवेल - आज आर. आर आबा असते तर कदाचित लेडीज डान्सबारविरोधी निषेध सभा आयोजित करण्याची वेळच आली नसती, असे भावनिक उद्गार दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी पनवेलमध्ये काढले. पनवेलमध्ये आयोजित केलेल्या लेडीज डान्सबारविरोधी निषेध सभेत महिलांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.


हेही वाचा -उतारावर ब्रेक न लागल्याने दापोली-पुणे एसटी बस पलटी, २५ प्रवासी जखमी
लेडीज डान्सबार महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी राज्यातील सामाजिक क्षेत्रातील रणरागिणी एकटवल्या असून राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात या रणरागिणी मुंबईत धडकणार असल्याचा निर्णय आज पनवेल येथे आयोजित केलेल्या निषेध सभेत झाला. 'डान्सबार बार बंद करा, नाहीतर घरी जा', 'देवेंद्र फडणवीस होश मे आओ', अशी घोषणाबाजी करत स्मिता पाटील, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, ज्येष्ठ सामाजिक नेत्या कल्पना इनामदार आणि कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्या कन्या अॅड. प्रतिक्षा लाड या रणरागिणी एकत्र येणार आहेत.
डान्सबारवरील बंदी उठवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश समाजाला पुन्हा घातक ठरणार असल्याने राज्य सरकारने फेरविचार करून अध्यादेश काढावा. तसेच बंदी आदेश कायम करावेत, यासाठी पनवेलच्या नंदनवन कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन पनवेल संघर्ष समितीने केले होते.

हेही वाचा -पीएनबी घोटाळ्यानंतर मेहुल चोक्सीचा आणखी एक घोटाळा; 'सेझ' जमीन गैरव्यवहारात नाव
संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या निषेध सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, स्मिता पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेत्या कल्पना इनामदार, प्रतिक्षा लाड उपस्थित होत्या. महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबार विकृती फोफावणार आहे. त्याचा धोका ओळखून पनवेल संघर्ष समितीने डान्सबार बंदीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्रातून ही विकृती हद्दपार करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेलमध्ये ही निषेध सभा आयोजित केली होती.

हेही वाचा - जिल्ह्यात माघी गणेशोत्सव जयंतीनिमित्त गणेश भक्तांची दर्शनासाठी गर्दी
यावेळी स्मिता पाटील यांनी पनवेलकरांशी संवाद साधताना आबांच्या आठवणींना उजाळा दिला. फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात लेडीज डान्सबारवरची बंदी उठवली गेली, ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात कुठल्याही परिस्थितीत डान्सबारची 'छमछम' पुन्हा सुरू होऊ द्यायची नाही, असा विडाच जणू स्मिता पाटील यांनी उचलला आहे. यावेळी बोलताना स्मिता पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. केवळ १२५ कोटी रुपये करस्वरूपात निधी मिळेल म्हणून डान्सबारवरील बंदी उठवण्यात येत असेल आणि या निर्णयाला विरोध केल्याने जर १२५ घरातील संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचत असतील, तर मी सरकारविरोधात उभी राहीन, असा इशारा स्मिता पाटील यांनी दिला.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES