• A
  • A
  • A
उतारावर ब्रेक न लागल्याने दापोली-पुणे एसटी बस पलटी, २५ प्रवासी जखमी

रायगड - दापोलीहून पुण्याकडे येत असलेल्या एसटी बसला रेवतळे घाटात अपघात झाला. घाट उतरताना ब्रेक न लागल्याने बस रस्त्यात पलटी होऊन २५ प्रवासी जखमी झाले. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.


दापोली एसटी आगारातून एसटी बस (एमएच १६ बीटी ३३८६ ) शनिवारी सकाळी पुण्याकडे निघाली होती. महाड तालुक्यातील रेवतळे घाट येथे बस आली असता उतारावर बसचा ब्रेक लागला न गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात २५ प्रवाशी जखमी झाले आहेत.
वाचा- रखडलेला विकास पूर्ण करायचा असेल तर गोंदिया मध्यप्रदेशला जोडा - कमलनाथ
अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. त्याचबरोबर पोलीस, एसटी महामंडळाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन जखमी प्रवाशांना महाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. १६ जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून बाकी किरकोळ जखमींना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. जखमींना एसटी मंडळाकडून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी तहसीलदार व पोलीस तसेच अन्य अधिकारी यांनी जखमी प्रवाशांची भेट घेतली आहे.

वाचा- पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठीच पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात..!

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES