• A
  • A
  • A
व्हर्गो लॉजिस्टिक्सच्या कार्यालयास आग

रायगड - उरण तालुक्यातील जासई येथे व्हर्गो लॉजीस्टिक्सच्या कार्यालयास आज अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर जेएनपीटी व सिडकोच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.


उरण तालुक्यातील जासई येथे व्हर्गो लॉजीस्टिक कंपनीचे कार्यालय कंटेनरमध्ये आहे. या कार्यालयाला सकाळच्या वेळात अचानक आग लागली. आगीमध्ये कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक समानसह कागदपत्रे जळून खाक झाली. आग लागल्यानंतर जेएनपीटी व सिडकोच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. या आगीत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र, ही आग नेमकी कशाने लागली याबाबतची माहिती मिळाली नाही.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES