• A
  • A
  • A
पीएनबी घोटाळ्यानंतर मेहुल चोक्सीचा आणखी एक घोटाळा; 'सेझ' जमीन गैरव्यवहारात नाव

पनवेल - देशातला सर्वात मोठा बँकिंग घोटाळा ठरलेल्या पीएनबी घोटाळ्यानंतर फरार हीरे व्यापारी मेहुल चोक्सीचा पनवेलमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. चोक्सी याने २००८ साली तब्बल ३०० कोटींची जमीन गीतांजली जेम्स या कंपनीच्या नावाने स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये खरेदी केली होती. पण ही जमीन त्याने कंपनीच्या नावे खरेदी न करता स्वतःच्या नावाने खरेदी केली आहे. त्यामुळे आता मेहुल चोक्सीच्या नावात आणखी एका मोठ्या घोटाळ्याचा समावेश होणार असून त्याच्या दिवाळखोर कंपनीला सेझसाठी जमीन दिली कशी? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.


पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटींचा चुना लावून देशातून फरार झालेल्या मेहुल चोक्सीने पनवेलमध्येही जमीन सेझ अंतर्गत मोठ्या प्रमाणात मिळवून त्यावर कर्ज काढले आणि ते गहाण ठेवले असल्याचे उघड झाले आहे. पनवेलमधल्या चिरवत आणि सांगूरली या दोन गावामध्ये सुमारे २५ एकर सेझ अंतर्गत जमीन आहे. या जमिनीची किंमत सुमारे ३०० कोटी इतकी सांगितली जात आहे. या दोन्ही गावांची जमीन ग्रीन झोनमध्ये येत होती. २००८ साली हीरे व्यापारी मेहुल चोक्सी यांनी ही जमीन गीतांजली जेम्स या कंपनीसाठी सेझ अंतर्गत खरेदीसाठी पत्रव्यवहार केला. हा पत्रव्यवहार चिरवत आणि सांगूरली गावातील डेव्हलपमेंट कमिश्नर (इंडस्ट्रीज) मलिनी शंकर यांच्याशी केला होता.

वाचा - VIDEOः वाऱ्याच्या झोताने हलू लागला इमारतीचा खांब, रहिवाशांचा जीव टांगणीला
या तीन शर्तीवर जमीन खरेदीचे दिले होते आदेश

पहिली अट अशी होती की, गीतांजली जेम्स लिमिटेड या कंपनीला सुरवातीला प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि एमएमआरडीए कडून ओद्योगिक वापरासाठी परवानगी घेणे गरजेचे होते. यासाठी मेहुल चोक्सी यांनी गीतांजली जेम्स लिमिटेड कंपनीच्या नावाने एफीडेविट केले होते. दुसरी अट अशी की, जमीन २ वर्षांच्या आत खरेदी करणे गरजेचे होते. तसेच तिसऱ्या अटीनुसार जमिन दिल्याच्या आदेशानंतर ५ वर्षांच्या आत या जमिनीचा औद्योगिक वापर सुरू झाला पाहिजे होता.

वाचा - उजनी येथे दुधातून विषबाधा; जुळ्या बहिणींचा मृत्यू, दोघींची प्रकृती गंभीर
या तिन्ही अटींची पुर्तता झाली नाही तर ती जमीन पुन्हा मूळ मालकाला आपल्या ताब्यात घेता येते. परंतु, धक्कादायक म्हणजे २००८ सालापासून या २५ एकर जमिनीवर कोणतेही औद्योगिक काम सुरू झालेले नसतानाही ही जमीन मूळ मालकाला परत दिली नाही. त्यांनतर ४ मे २०१७ रोजी तत्कालीन विकास आयुक्त विकास जैन यांनी केंद्र सरकारने या जमिनीसाठी सेझ अंतर्गत दिलेला आदेश रद्द केल्याचे सांगून ही जमीन खरेदी नाकारली होती.

सेझ अंतर्गत जमीन ही कंपनीच्या नावानेच खरेदी करावी लागते. परंतु फरार डायमंड व्यापारी मेहुल चोकसी यांनी कंपनीच्या नावाने ही जमीन खरेदी केलेली नसून स्वतःच्या नावाने आणि त्यांच्या ओळखीच्या ३ असोसिएट्सच्या नावाने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. यात रामचंद्र नामदेव देशमुख, नयना रामचंद्र काळे, नंदकुमार सहदेव महाडिक या ३ जणांची नावे असून नयना काळे यांच्या नावाने तीन जमिनी आहेत.

वाचा - बीडमधील गर्भपात प्रकरणः तिघे दोषी; डॉक्टर दाम्पत्याला १० वर्षांची शिक्षा
४ मे २०१७ रोजी विकास आयुक्त जैन यांनी ही जमीन खरेदी नाकारली असूनही तब्बल दोन वर्षानंतर पनवेल तहसील कार्यालयाला जाग आली. मेहुल चोक्सी यांनी खरेदी केलेल्या २५ एकर जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याबाबत जेव्हा प्रसारमाध्यमांत चर्चा होऊ लागली, त्यांनतर म्हणजे ६ फेब्रुवारी २०१९ रोजी पनवेल तहसील कार्यालयाने याबाबत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला. त्यामुळे या व्यवहारात तहसिल कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेक सरकारी अधिकारी आणि सोबतच स्थानिक बड्या नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय हा इतका मोठा घोटाळा होऊ शकत नाही, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव यांनी केले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES