• A
  • A
  • A
जिल्ह्यात माघी गणेशोत्सव जयंतीनिमित्त गणेश भक्तांची दर्शनासाठी गर्दी

रायगड - माघी गणेशोत्सव जयंतीनिमित्त आज जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. अलिबाग कुलाबा किल्ल्यातील पुरातन सुवर्ण गणेश पंचायतन गणरायाच्या दर्शनाला गणेशभक्तांनी पहाटेपासून गर्दी केली. महाड, पाली येथील अष्टविनायक गणपतीला रात्रीपासूनच भाविकांनी दर्शन घेण्यास सुरुवात केली होती.


अलिबागमधील कुलाबा किल्ल्यात सुवर्ण गणेश पंचायतन गणरायाचे पुरातन मंदिर आहे. माघी गणेशोत्सव हा कुलाबा किल्ल्यात नवसाच्या रूपाने सुरू झाला आहे. यानिमित्ताने अलिबागकर एकत्र येऊन किल्ल्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाची सोय मंडळांकडून केलेली असते.
हेही वाचा - मुहूर्ताची वाट न पाहता नागरिकांनीच केले उड्डाणपूलाचे अनौपचारिक उद्घाटन
सकाळपासूनच कुलाबा किल्ल्यातील गणेशाच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावलेल्या दिसल्या. समुद्राला भरती असल्याने भाविकांनी बोटीतून दर्शनाला गेले. ओहटी लागल्यानंतर भाविकजण समुद्र किनाऱ्यावरून चालत दर्शनासाठी येत आहेत. किल्ल्यातील गणरायाच्या दर्शनासाठी अलिबागसह जिल्ह्यातून पर्यटनासाठी येणारे लाखो गणेशभक्त येत असतात.
हेही वाचा -पनवेल डेपोला 'बसपोर्ट' करण्याच्या कामाला सुरुवात, प्रवाशांना मिळणार सुविधा
जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी महाड, पाली, नांदगाव, मुगवली, चौल मुखरी गणपती या सारख्या प्रसिद्ध गणेश मंदिरातही पहाटेपासून भक्तांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव निमित्ताने सार्वजनिक गणरायाची स्थापना करण्यात आली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES