• A
  • A
  • A
मुहूर्ताची वाट न पाहता नागरिकांनीच केले उड्डाणपूलाचे अनौपचारिक उद्घाटन

पनवेल - दीड वर्षभरापूर्वी मुंब्रा मार्गावरील कळंबोलीनजीक लोहपोलाद बाजाराजवळ असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र, उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने एमएमआरडीएने वाहतुकीसाठी पूल सुरू केला नव्हता. अखेर दररोजच्या वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनीच या उड्डाणपुलाचे अनौपचारिक उद्घाटन केले. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने पनवेलकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


कळंबोली लोह पोलाद बाजार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि उरण येथे जाणारा जेएनपीटी मार्ग यांना जोडणारा रस्ता आहे. या उड्डाणपुलाचे काम गेली दीड वर्षे सुरू होते. अखेर या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले, मात्र केवळ उद्घाटनाअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होईल का? असा सवाल येथून ये-जा करणारे वाहनचालक करत होते. केवळ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले हे उड्डाणपूल सुरू न झाल्याने या परिसरात होणाऱ्या कोंडीत पनवेलकर भरडले जात होते. पनवेल-मुंब्रा मार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. या वाहतूक कोंडीला कंटाळून कोणत्याही उद्घाटनाच्या मुहूर्ताची वाट न पाहता इथल्या स्थानिक नागरिकांनी या उड्डाणपुलाच्या अनौपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून टाकला. नागरिकांचा हा निर्णय पनवेलमधील लोकप्रतिनिधीला दिलेली सणसणीत चपराक आहे. हा उड्डाणपूल खुला झाल्याने पनवेलकरांनी समाधान व्यक्त केला आहे.

हेही वाचा - पनवेल डेपोला 'बसपोर्ट' करण्याच्या कामाला सुरुवात, प्रवाशांना मिळणार सुविधा
दरम्यान, उड्डाणपूल तयार असूनही तो सुरू करण्यात येत नव्हता. त्यांना गेली दीड वर्षे वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे नागरिकांनी तो खुला केला असून वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी दिली.

हेही वाचा- जयंत पाटलांना उच्च न्यायालयाचा दणका, पीएनपी कंपनीकडील थकीत रक्कम भरण्याचे आदेशCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES