• A
  • A
  • A
पनवेल डेपोला 'बसपोर्ट' करण्याच्या कामाला सुरुवात, प्रवाशांना मिळणार सुविधा

पनवेल - पनवेल डेपोला बसपोर्ट करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाला मुहूर्त मिळाला. पनवेल बस डेपोभोवती बॅरिकेट्स उभारण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. सुविधांनी परिपूर्ण प्रवासासाठीची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा - वातानुकूलित शिवशाही बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना मिळणार सवलत
विमानतळाच्या धर्तीवर राज्यात एसटी महामंडळ ९ नवीन बस डेपो तयार करणार आहे. यामध्ये विमानतळावर ज्या सुविधा मिळतात त्या एसटीच्या प्रवाशांसाठी दिल्या जातील. यात पनवेल डेपोचाही समावेश असून, या आगाराचे रूपांतर बसपोर्टमध्ये केले जाणार आहे. पनवेल डेपोच्या जागेवर नवीन इमारती बांधणार, इथल्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार, व्यापारी संकुल, येणाऱ्या प्रवाशांसाठी वेटिंगची अत्याधुनिक सोय होणार हे पनवेलकरांसाठी एकेकाळी दिव्य स्वप्न ठरले होते. पण आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार असून पनवेल डेपोमध्ये बॅरिकेट्स उभारण्याच्या कामापासून सुरुवात झाली आहे. एसटी आगारात अनेक वर्षांपासून व्यवसाय करणारी ६ ते ७ दुकाने आहेत. त्यांना मार्च अखेरपर्यंत दुकाने खाली करण्याच्या सूचना एसटी महामंडळातर्फे नोटीसीतून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - पुण्यात विनाचालक बसचा थरार; कारवर धडकून थांबल्याने अनर्थ टळला

पनवेल बस डेपोचे काम सुरू झाल्यावर डेपोवरील दुरुस्ती विभाग रेल्वे स्थानकासमोरील भूखंडावर हलवण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी सुरुवातीला बस थांब्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर व्यावसायिक वापराच्या जागेचे काम सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा - सावित्रीच्या लेकीच्या हाती एसटीचे स्टेरिंग, २५ मुलींनी स्वीकारले आव्हान


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES