• A
  • A
  • A
माता न तू वैरीणी; जन्मदात्या आईकडूनच चिमुकलीला मेणबत्तीचे चटके

पनवेल - माता न तू वैरीणी असे म्हणावे, अशी घटना पनवेलमध्ये घडली. घरात मस्ती करते म्हणून जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या मुलीला चक्क मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना पनवेलच्या कळंबोलीत घडली.


अनेकांच्या घरात केविलवाणी बोलणारे, घरभर पसरून खेळणारी लहान मुले हे घराचे अस्तित्व ठरतात. परंतु पनवेलच्या कळंबोलीत एका घरात मात्र एका चिमुकलीचे घरात खेळणे, बागडने तिच्या जन्मदात्या आईला डोकेदुखी ठरत होती. त्यामुळे तिच्या आईने आणि काकूने मिळून तिला मेणबत्तीचे चटके देऊन शिक्षा दिली.
हेही वाचा - पनवेलमध्ये छोट्या शेतकऱ्यांची शोधमोहीम युद्धपातळीवर
कळंबोलीतल्या रोडपली येथील श्री विनायक सोसायटीमध्ये यादव हे कुटुंब राहते. साक्षी ही त्या घरातील ५ वर्षांची मुलगी आहे. ती स्वभावाने खोडकर आणि मस्तीखोर आहे. मात्र तिची मस्ती सहन होत नसल्यामुळे आई अनिता यादव आणि चुलती रिंकी यादव या दोघींनी मिळून तिच्या अंगावर मेणबत्तीचे चटके देऊन शिक्षा दिली. मुलीचे वडील घनश्याम यादव कामावरून घरी परतले तेव्हा चिमुकल्या मुलीची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला. चटके कोणी दिले याची मुलीकडे विचारणा केली असता तिने आई आणि काकूचे नाव सांगितले.
हेही वाचा - पनवेलमध्ये विजेचा धक्का लागून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मुलीच्या आईला आणि तिची साथ देणार्‍या मुलीच्या काकूला अटक केली आहे. माझी मुलगी खट्याळ आहे ती जास्त मस्ती करत असल्याने तिच्या आईने आणि काकुने ३ फेब्रुवारीला तिला मेणबत्तीचे चटके दिले, अशी माहिती घनश्याम यादव यांनी दिली. या प्रकारामुळे मुलीचा चेहरा आणि हातावर भाजल्याच्या खुणा राहिले आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES