• A
  • A
  • A
जयंत पाटलांना उच्च न्यायालयाचा दणका, पीएनपी कंपनीकडील थकीत रक्कम भरण्याचे आदेश

रायगड - शेतकारी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांची रायगडमध्ये पीएनपी मेरीटाईम सर्व्हीसेस नावाची कंपनी आहे. या कंपनीकडील थकीत रक्कम भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पाटील यांना दिले आहेत. या कंपनीकडे २५ कोटी २४ लाख ३९ हजार ८८४ इतकी थकीत रक्कम आहे. ही रक्कम त्यांना ६ टक्के व्याजासह परत करायची आहे. यासाठी १० आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.


या आदेशाच्या तात्काळ अंमलबजावणीला पीएनपी कपंनीचे वकील अॅड. सी. जे. गव्हाणेकर यांनी स्थगिती मागितली होती. पण, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. हे आदेश उच्च न्यायालयाने २२ जून २०१७ रोजी दिले असल्याने, ही रक्कम वसूल करण्याबाबत मेरीटाईम बोर्डाने काय कार्यवाही केली, याबाबत अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी विचारणा केली. तेव्हा आदेशाविरूध्द पीएनपी कंपनी सुप्रीम कोर्टात गेली असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - पनवेलमध्ये विजेचा धक्का लागून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी या प्रकरणी शासनाचे गृह विभागाचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्‌ मेरीटाईम बोर्ड यांना याबाबत पत्र लिहले आहे. कंपनीने न्यायालयात केलेल्या अपील केल्याचे सांगितले आहे. पण, सर्वोच्च न्यायालायच्या वेबसाईटवर, अशा प्रकारचे कोणतेही अपील दिसत नाही. तसेच, कंपनीने शासनास बजावलेल्या नोटीशीची प्रत आणइ न्यायालयातील केस नंबरही दिसत नाही, असे त्यांना या पत्रात सांगितले आहे. ठाकूर यांची तक्रार राज्याच्या मुख्य सचिवांनी गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना पाठविली असून, त्याची माहिती ठाकूर यांना ईमेलव्दारे देण्यात आली आहे.
हेही वाचा - पनवेलमध्ये छोट्या शेतकऱ्यांची शोधमोहीम युद्धपातळीवर

मेरीटाईम बोर्डाने कंपनी व बोर्ड यांच्यातील करारनाम्यानुसार या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय लवाद नेमण्यात आल्याचे ठाकूर यांना कळविले आहे. लवादाचा निर्णय पीएनीपी कंपनीच्या बाजूने लागल्यावर या प्रकरणात मेरीटाईम बोर्डाचे पर्यायाने शासनाचे नुकसान होवू नये, अशी भूमिका घेवून मधुकर ठाकूर यांनी मेरीटाईम बोर्डाकडे सदरचे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्यासाठी आग्रह धरला होता. त्याप्रमाणे मेरीटाईम बोर्डाने मुंबई उच्च न्यायालयात २०११ मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम.सावंत यांनी २२ जुन २०१७ रोजी देवून पीएनपीकडे थकित असलेले २५ कोटी २४ लाख ३९ हजार ८८४ इतके चढणावळ/उतरणावळ शुल्क ६ टक्के व्याजासह भरण्याचे आदेश पारित केले आहेत.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES