• A
  • A
  • A
पनवेलमध्ये विजेचा धक्का लागून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

पनवेल- दिवा रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीवर तपासणीसाठी चढलेल्या एका रेल्वे कर्मचार्‍यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. राकेश कुमार पांडू असे त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.


हेही वाचा- आरटीओने रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सामुहिक जलसमाधीचा इशारा
राकेश कुमार हे रेल्वेच्या सी एन डब्ल्यू विभागात फिटरचे काम करत होते. कोकण रेल्वे मार्गावरील कळंबोलील्या रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीची तपासणी करण्यासाठी ते गाडीच्या छातावर चढले होते. त्याचवेळेस त्यांना विजेचा इतका जोरदार झटका लागला, की त्यांचा जागीच मृत्यू झाला. मालगाडीवरुन जाणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्यांशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घडलेल्या घटनेची माहिती कळंबोली अग्निशामक दलास देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी राकेश कुमार यांचा मृतदेह गाडीवरून खाली उतरवला.
हेही वाचा- काँग्रेसच्या अभद्र आघाडीमुळे मी पक्ष सोडला - रवींद्र पाटील
दरम्यान या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा- नाहरकत दाखल्यासाठी २५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES