• A
  • A
  • A
आरटीओने रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सामुहिक जलसमाधीचा इशारा

रायगड - आरटीओ कार्यालयाने रिक्षा चालकांच्या (६ सिटर्स) मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येत्या १२ फेब्रुवारी रोजी सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशारा रिक्षा चालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे.


हेही वाचा- काँग्रेसच्या अभद्र आघाडीमुळे मी पक्ष सोडला - रवींद्र पाटील
पेण तालुक्यातील ८० गावे, तर अलिबाग तालुक्यातील ११९ गावे ग्रामीण भागात असतानाही तिथे वाहतूकीसाठी शहरी भागाचे नियम लावण्यात आले आहेत. त्यामध्ये १६ वर्ष जुन्या रिक्षा (६ सिटर्स) न चालवण्याचा आदेश आरटीओ विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे १६ वर्षापुढील रिक्षा चांगल्या स्थितीत असूनसुद्धा मोडून टाकाव्या लागत आहेत. परिणामी अनेक रिक्षाचालकांच्या पोटावर पाय येण्याची शक्यता आहे. तसेच ७० ते ८० हजार रुपये खर्च करून रिक्षा पासिंग करण्यात आले नसल्यामुळे रिक्षा चालक आपला व्यवसाय करू शकत नाहीत.

हेही वाचा- नाहरकत दाखल्यासाठी २५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत

त्यामुळे पेण सारख्या ग्रामीण भागासाठी हे नियम शिथिल करावेत आणि सुस्थितीत असणाऱ्या रिक्षा त्वरित पासिंग करून मिळाव्यात या मागणीचे निवेदन पाटील यांनी पेण परिवहन कार्यालयाच्या अधिकारी उर्मिला पवार यांना दिले आहे. तसेच या प्रकारामुळे जर कोणत्याही रिक्षा चालकाने आत्महत्या केली तर त्यास संबंधित अधिकारीच जबाबदार राहतील असेही निवेदनात म्हटले आहे. तरी प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार न केल्यास पेण- अलिबागला जोडणाऱ्या धरमतर पुलावरून रिक्षा चालक सामुहिक रित्या उडी मारून जलसमाधी घेतील असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा- काँग्रेसचे रवींद्र पाटलांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES