• A
  • A
  • A
काँग्रेसच्या अभद्र आघाडीमुळे मी पक्ष सोडला - रवींद्र पाटील

रायगड - काँग्रेस पक्षश्रेष्टींनी अभद्र आघाडी केल्याने मी काँग्रेस पक्ष सोडला असल्याचे पेण मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार व माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


हेही वाचा -काँग्रेसचे रवींद्र पाटलांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
रवींद्र पाटील हे काँग्रेस सोडणार असल्याबाबतच्या बातम्या रायगडमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर रवींद्र पाटील यांनी अखेर हाताला बाजूला सारून 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री भाजपचे कमळ हातात घेतले. पेण येथे आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण विचारल्यानंतर ते बोलत होते.

हेही वाचा -नाहरकत दाखल्यासाठी २५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत
रायगड जिल्ह्यात शेकाप हा काँग्रेसचा पारंपरिक राजकीय शत्रू आहे. असे असताना लोकसभेसाठी काँग्रेसने जिल्ह्यात शेकापला बरोबर घेऊन अभद्र आघाडी केली आहे. ही आघाडी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य नसल्याने मी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे, असे रवींद्र पाटील म्हणाले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES