• A
  • A
  • A
नाहरकत दाखल्यासाठी २५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत

रायगड - रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकाला २५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. आनंतराज मेश्राम (५१) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.


हेही वाचा - बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना ५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
तक्रारदार यांचे रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायती हद्दीत बांधकाम सुरू आहे. या बांधकामाबाबत ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखला मिळण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामसेवक मेश्राम यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार ग्रामसेवक यांनी त्यांना ना हरकत दाखला ग्रामपंचायतीचा दिला होता. मात्र, हा ना हरकत दाखला नियमानुसार दिला नव्हता. याबाबत तक्रारदार यांनी ग्रामसेवक मेश्राम यांना नियमानुसार दाखला देण्याबाबत सांगितले. नियमानुसार दाखला देण्यासाठी आनंतराज मेश्राम यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजाराची लाचेची मागणी केली.

हेही वाचा - शेगाव नगरपालिकेच्या लाचखोर मुख्य अधिकाऱ्यासह लिपीकाला अटक
आरोपी मेश्राम यांनी मागितलेली लाच फिर्यादी यांना द्यायची नव्हती. तरीही मनाविरुद्ध ही रक्कम पनवेल येथे हॉटेल सरोवरमध्ये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी अलिबाग येथे लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचला. आरोपी आनंतराज मेश्राम हे पनवेल येथील हॉटेल सरोवर येथे लाचेची रक्कम घेण्यास आले असता लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

पोलीस उप अधीक्षक विवेक जोशी, पोलीस निरीक्षक बकाले, पोलीस हवालदार पाटील, गंभीर मोरे, पोना तारी, शिर्के, पोलीस शिपाई मगर यांनी ही कारवाई केली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES