• A
  • A
  • A
वरई येथे एसटी बसला अपघात, बारा विद्यार्थी जखमी

पालघर - वरई-पारगाव रस्त्यावरील वरई नजीकच्या वळणावर एसटी बसला अपघात झाला. अपघातात एसटी बस रस्त्यावरून ५ फूट खाली घसरून नाल्यात पडली. या अपघातात एसटी बसमधून प्रवास करणारे दहिसरच्या स्वातंत्र्य सैनिक न. ल. पाटील माध्यमिक विद्यालयाचे १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वसईच्या हायवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दहिसरच्या स्वातंत्र्य सैनिक न.ल.पाटील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सफाळे-वरई मार्गावर एसटी बसमधून (MH ०७ C ७५०५ ) वरईकडे जात होते. बसला वरई फाट्याजवळच्या वळणावर ट्रकला धडकून अपघात झाल्याने एसटी बस रस्त्यावरून शेतातील नाल्यात पडली.
या अपघातात एसटीमध्ये प्रवास करत असलेले १२ विद्यार्थी जखमी झाले. यात ५ विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झाले आहेत. एका विद्यार्थ्यांच्या तोंडाला मार लागल्याने दात पडले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना महामार्गावरील वसई फाटा येथील हायवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES