• A
  • A
  • A
सातपाटी पोलिसांची बेकायदेशीर दारू हातभट्टीवर कारवाई; २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पालघर - सातपाटी पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर सातपाटी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला आहे. शिरगाव ग्रामपंचायतीतील ऊसबाव येथे एका निर्जन स्थळी हा गैरप्रकार सुरू होता. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


सातपाटी पोलिसांना ऊसबाव येथे बेकायदेशीर हातभट्टीची दारू बनविण्याचाचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सातपाटी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनवण्याचा अड्डा सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल आपल्या ताब्यात जप्त केला असून दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे.
हेही वाचा -पालघरमधील सातपाटीत समुद्री धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू
हातभट्टीचा अड्डा चालवणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा -चिल्हार फाट्यावर स्फोटकांनी भरलेले टेम्पो जप्त; पालघर गुन्हे शाखेची कारवाई

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES