• A
  • A
  • A
पालघरमधील सातपाटीत समुद्री धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू

पालघर - सातपाटी येथे समुद्री धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित सातपटी येथील बंधारा उभारणीच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर ४२५ मीटर्स लांबीच्या कामासाठी ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. तर उर्वरित १ कोटींच्या कामाचे टेंडर लवकरच निघणार असल्याची माहिती पतन विभाग अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


या कामासाठी खासदार राजेंद्र गावित, आमदार अमित घोडा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य मुकेश मेहेर आदींनील पाठपुरावा केला होता.
२०१२ रोजी सातपाटी गावाच्या पश्चिमेकडील समुद्राच्या लाटा थोपवून धरण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. मात्र, त्यानंतर या बंधाऱ्याच्या नादुरुस्तीमुळे समुद्राचे पाणी गावात शिरून मोठी वित्तहानी होऊ लागली. जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावात अशीच भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर ग्रामपंचायत, सहकारी संस्थांच्या मागणीनंतर शासन पातळीवर सादर करण्यात आलेल्या कोस्टल झोन प्लॅनमध्ये जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि वसई तालुक्यातील धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र, केंद्रीय सीआरझेड विभागाने नाकारलेल्या परवानग्या आणि काही पर्यावरण वाद्यांनी हरित लवादात दाखल केलेली याचिकेमुळे तिन्ही तालुक्यातील मंजूर बंधाऱ्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली. त्याचा गंभीर परिणाम किनारपट्टीवरील गावांना भोगावा लागला. सातपाटी गावातील सुमारे 300 घरांमध्ये पाणी शिरून मोठी वित्तहानी झाल्याची घटना घडली होती.

समुद्राच्या पाण्याची सतत वाढणारी पातळी आणि जीवितहानीची शक्यता पाहता सातपाटीच्या पश्चिमेकडे बंधारा बांधणे खूप गरजेचे असल्याने ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने या दुरुस्तीसाठी राज्यशासनाने तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले. तसेच किनारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ-बांद्रा यांनी राष्ट्रीय आपदा प्रतिबंधक अधिनियम २००५ अन्वये सातपाटी येथे धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या परवानगीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने बंधाऱ्याची पुनर्बांधणी आणि उंची वाढविणे गरजेचे असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत बंधारदुरुस्तीच्या कामाला ५ फेब्रुवारी २०१९ रोजी मंजुरी दिली.

बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी जि.प.सदस्य व माजी उपाध्यक्ष सचिन पाटील ,पंचायत समिती सदस्य मुकेश मेहेर, संस्थेचे चेअरमन राजेंद्र मेहेर, पंकज पाटील, सरपंच अरविंद पाटील तसेच विविध संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES