• A
  • A
  • A
पालघर नगरपरिषद : २८ जागांसाठी १४८ अर्ज, तर महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपदासाठी ११ जणी इच्छुक

पालघर - नगरपरिषदेच्या २८ जागांसाठी १४८ अर्ज दाखल झाले आहेत. महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष अनेक विद्यमान शिवसेना नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्याने त्यापैकी अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा मार्ग अवलंबला आहे. या अर्जांची उद्या छाननी करण्यात येऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.


पालघर नगरपरिषदेच्या २८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी तसेच जनता दल यांच्यामध्ये आघाडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस १५ , काँग्रेस पक्षाला ७, बहुजन विकास आघाडीला ५ तर जनता दलाला एक अशा पद्धतीने जागेचे वाटप झाले आहे.
शिवसेना व भाजपमध्ये युती होऊन शिवसेनेने १९ तर भाजपने (९) नऊ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या काही नगरसेवकांचे समाधान करण्यात शिवसेना यशस्वी ठरली असून, नगराध्यक्ष पदासाठी देखील राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या श्वेता पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसेनेने देऊ केली आहे. या निर्णयाबाबत निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पालघरच्या नगराध्यक्षपदासाठी अकरा महिलांनी उमेदवारी अर्ज भरले असून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. उज्ज्वला काळे, शिवसेनेतर्फे श्वेता मकरंद पाटील यांचा समावेश आहे. याखेरीज माजी नगराध्यक्ष अंजली पाटील, विद्यमान नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांच्या पत्नी दीपाली पिंपळे यांच्यासह रेश्मा नंदकुमार पाटील, लक्ष्मीदेवी हजारी, विजयलक्ष्मी पाखरे, शिल्पा वाजपेयी, संध्या दीक्षित, अनुजा तरे व रूपाली राऊत यांचा समावेश आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES