• A
  • A
  • A
पालघरमध्ये साडेआठ किलो स्फोटकासह १८३ जिलेटीनच्या कांड्या जप्त

पालघर - विरार जवळील सायवन व चांदीप येथून साडेआठ किलो स्फोटके आणि १८३ जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पालघर स्थानिक गुन्हे शाखा आणि विरार पोलिसांनी मिळून वाळू माफियांवर ही कारवाई केली आहे. खाडीतील रेती उपसा करण्यासाठी या स्फोटकांचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


विरार पोलिसांनी सोमवारी सायवन येथे छापा टाकून तब्बल १८३ जिलेटीनच्या कांड्या, नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या ३४५ आणि सेफ्टी फ्युजची २१ बंडले जप्त केली आहेत. या प्रकरणी बंगल्याच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. विरार पोलिसांनी ट्रकचालक, मालक आणि वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा - पालघरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन सकारात्मक - मुख्यमंत्री
वसई तालुक्यात वाळू माफिया सेक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करतात. रविवारी रात्री पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाळू माफियांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान वाळू माफिया पळून गेले. मात्र, चांदीप येथील एका घरात स्फोटके लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी या घरावर छापा टाकून २४ जिलेटीनच्या कांड्या आणि साडेआठ किलो स्फोटके जप्त केली आहेत.

हेही वाचा- अल्पवयीन मुलीवर १२ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती
वाळू माफियांनी आता खाडीतील वाळू काढण्यासाठी स्फोटकांचा वापर सुरू केला आहे. या स्फोटकांच्या आधारे खाडीच्या तळाशी स्फोट करून खाली रुतलेली वाळू सैल करून सेक्शन पंपाच्या आधारे वाळूचा उपसा केला जात होता, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES