• A
  • A
  • A
पालघरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन सकारात्मक - मुख्यमंत्री

पालघर - अन्न, वस्त्र, निवारा या बरोबरच आता शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यादेखील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी आरोग्याची सुविधा सर्वांना मिळालीच पाहिजे. त्यामुळे एकही रुग्ण पैशांअभावी उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेत आहे. याच विचारातून पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


पालघरमध्ये अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाआरोग्य शिबिर ही सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणारी मोठी संकल्पना असून प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. पालघर येथे जिल्हा रुग्णालयासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक असून त्यासाठी लागेल तेवढी जागा देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES