• A
  • A
  • A
'अटल महाआरोग्य' शिबिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पालघर - येथे लोकसहभागातून आयोजित विनामूल्य 'अटल महाआरोग्य' शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण पालघर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य तपासणी करण्यात आली.


हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर १२ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती
शिबिरात रक्त-लघवी तपासणी, स्त्री-रोग, बालरोग, सिकलसेल, थॅलेसिमीया, त्वचारोग, जनरल मेडिसीन, मनोविकार, हृदयरोग, श्वसनविकार, मेंदूरोग, वृद्धांवरील उपचार, कृत्रिम अवयव, हाडांची तपासणी, रक्तदान, कान-नाक-घसा, नेत्र, जनरल सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, लठ्ठपणा, कर्करोग, मूत्ररोग, दंत, (आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी), योग, आदी आजारांसंबंधी मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय शस्त्रक्रिया नोंदणी, आपत्कालीन तसेच चौकशी व मदत विभाग या ठिकाणी ऊभारण्यात आले होते. तसेच या शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया व अधिक उपचाराची आवश्यक असल्यास, या रुग्णांची नोंदणी करून त्यांना विनामूल्य उपचार उपलब्ध करण्यात येणार आहेत.
महाआरोग्य शिबराच्या उदघाटन प्रसंगी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री विलास तरे, पास्कल धनारे, निरंजन डावखरे, विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह परिसरसतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीसCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES