• A
  • A
  • A
पालघर जिल्ह्यात ७ संवेदनशील केंद्रे 'भरारी' पथकाच्या रडारवर

पालघर - दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. पालघर जिल्ह्यातील एकूण १०४ केंद्रांतून ६० हजार ६४८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसणार आहेत. जिल्ह्यातील १०४ परीक्षा केंद्रांपैकी ७ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. ही केंद्रे भरारी पथकाच्या रडारवर आहेत.

परीक्षेला आलेले विद्यार्थी


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या नवीन अभ्याक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे.
परीक्षा सुरळीत पार पडून केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी शासनाकडून जिल्हा दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत पोलीस आयुक्त, त्यांचा प्रतिनिधी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्‍या आहेत.
पालघर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी वाडा तालुक्यातील ६ केंद्रांमधून ३४६०, मोखाडा तालुक्यातील ४ केंद्रांमधून १४१४, विक्रमगड तालुक्यातील ६ केंद्रांमधून २९४९, जव्हार तालुक्यातील ४ केंद्रांमधून २२६८, तलासरी तालुक्यातील ७ केंद्रांमधून ५०१३, डहाणू तालुक्यातील ९ केंद्रांमधून ५७८५, पालघर तालुक्यातील १५ केंद्रांमधून ८५८८ तर सर्वाधिक वसई तालुक्यातील ५३ केंद्रांमधून ३११७१ विद्यार्थी, असे एकूण १०४ केंद्रांमधून ६०६४८ विद्यार्थी या परीक्षेस बसणार आहेत.
संवेदनशील केंद्रे

जिल्ह्यातील ७ परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मोखाडा तालुक्यातील हिरवे, करेगाव, विनवळ तर नालासोपारा-वसईमधील ज्ञानोदय, जव्हारमधील दाभोसा तर आश्रमशाळा चाबके-तलावली व कळमदेवी आदी परीक्षा केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES