• A
  • A
  • A
शासकीय योजनेचा राजकीय लाभ! 'महाआरोग्य शिबिराचे श्रेय लाटण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न

पालघर - शहरात येत्या ३ मार्चला "विनामूल्य भव्य अटल आरोग्य शिबिराचे" आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी आदिवासी विभाग विकास विभागाकडून ९५ लक्ष रुपयांचे अर्थसाह्य घेण्यात आले आहे. असे असताना या शिबिराच्या आयोजनाचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्याच्या नुतन प्रशासकीय इमारतीजवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या जाहिरात बोर्डवर भाजपचे चिन्ह कमळ आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकवित हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत, पक्षाच्या फंडातूनच या शिबिराद्वारे रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत, असे भासवून येणाऱ्या निवडणुकीत "मतांची"गणिते आखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पालघरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा -
जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सातबारा उदयनराजेंच्या संस्थेच्या नावावर - नरेंद्र पाटील
हे शिबिर ३ मार्चला असून या आधीच जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांची तपासणी प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या तपासणी प्रक्रियेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी भाजप कार्यकर्ते सरसावले असून या शिबिराच्या निमित्ताने मतदारानापर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष कार्यकर्ते धडपड करताना दिसत आहे.

हेही वाचा -
अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान उद्या मुक्त करणार - इमरान खान
या भव्य आरोग्य शिबिरासाठी आदिवासी विकास विभागाकडून तब्बल ९५ लक्ष रुपये मंजूर झाले असून या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संपूर्ण वैद्यकीय विभाग कामाला लावण्यात आले आहे. या शिबिराच्या आयोजनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत ३ आढावा बैठक घेण्यात आल्या असून या बैठकांमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे अनेक जिल्ह्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने कामे करावी लागत असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून खाजगीत सांगण्यात येत आहे.

हेही वाचा -
तुमच्या प्रेमाने भारावलोय, माझा मुलगा नक्की परत येईल -विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडीलांचे...
महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने येणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवेतील सलंग्न कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय तसेच खानपानाची सोय स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. शिबिरासाठी अपेक्षित १ लाख रुग्णांना आणण्याची तसेच त्यांना पुन्हा परत घरी घेऊन जाण्याची जबाबदारी ठिकठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये "दिवंगत खासदार एडवोकेट चिंतामण वनगा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भव्य आरोग्य शिबिर" हे भाजप पक्षाच्या मार्फत आयोजित केले जात असल्याचा आभास निर्माण होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून होऊ लागले आहेत.

सर्व शासकीय शिबिराला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न

शासनाच्या निधीतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याची योग्य प्रसिद्धी करण्यासाठी भाजपच्या काही मंडळीनी खासगी बॅनर लावले असून पालघर शहरासह काही ठिकाणी हॅन्ड बिल वितरण करण्यात आले आहेत. या हँड बिलवर व फलकांवर फक्त भाजपाच्या नेत्यांची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली असून या सर्व शासकीय शिबिराला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. हे शिबिर शासकीय आहे की भाजपतर्फे आयोजित करण्यात येत आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे.
या शिबिरासाठी पुरेशा संख्येत रुग्ण सहभागी होण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर सोपवण्यात आली आहे. मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ आगामी निवडणुकांमध्ये भाजपला व्हावा, हा छुपा अजेंडा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
हेही वाचा -
'समझौता एक्स्प्रेस' पाकिस्तानकडून रद्द; भारत-पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार
२४ मार्च रोजी होणाऱ्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालघरमध्ये २१ फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशा वेळी भाजपाच्या एका माजी जिल्हा उपाध्यक्ष यांनी या शिबिराचे संयोजक असल्याचे परिपत्रक पालघर शहरात वितरित गेल्याने या कृतीमुळे आचारसंहिता बदल झाल्याची तक्रार काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी लावलेल्या माहिती फलकामधे अनेक स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी स्वतःला संयोजक म्हणून या शिबिराचे श्रेय घेण्याचा केविलवाणे प्रयत्न केल्याचेही उघडकीस आले आहे.

पालघर मध्ये आयोजित होणारे महाआरोग्य शिबीर हे शासकीय असून त्याकरिता आदिवासी विकास विभागाकडून निधी घेण्यात आला आहे. या शिबिराशी कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नसून या शिबिराच्या आयोजनाचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES