• A
  • A
  • A
नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मकरंद पाटील, नगरसेविका श्वेता पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

पालघर - नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मकरंद पाटील व त्यांच्या पत्नी नगरसेविका श्वेता मकरंद पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सरचिटणीस अनिल गावड यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पाटील दाम्पत्य शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

नगरसेविका श्वेता पाटील


पालघर नगरपरिषदेची निवडणूक येत्या 24 मार्चला होणार आहे. पालघर नागरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता असून सेनेचे 17 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 10 व काँग्रेसचा 1 नगरसेवक, असे बलाबल होते. नगरसेवक मकरंद पाटील यांना गटनेतेपद आणि विरोधी पक्षनेते पद पक्षाने बहाल केले होते. त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न उचलून धरले नाहीत. याउलट सत्ताधाऱ्यांना मदत करणारी भूमिका बजावल्याचा ठपका जिल्हा सरचिटणीस अनिल गावड यांनी ठेवला. मकरंद पाटील यांनी सत्ताधाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.
मकरंद पाटील, त्यांच्या पत्नी नगरसेविका डॉ. श्वेता पाटील हे नगरपरिषदेच्या सभांना अनेक वेळा गैरहजर राहिले. तसेच सभांमध्ये कुठली भूमिका न घेणे, अक्रियाशील राहणे, या कारणांमुळे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पाटील दाम्पत्याने पक्षविरोधी कारवाई केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रभारी गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्या आदेशाने राष्ट्रवादी पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती गावड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES