• A
  • A
  • A
आरएसएसवर बंदी नको, संविधानाच्या चौकटीत आणा - प्रकाश आंबेडकर

पालघर - राष्ट्रीय स्वंयसेवक संघ संविधान मानत नसला, तरी त्यांच्यावर बंदी घालण्याच्या विरोधात आम्ही आहोत. आरआरएसवर बंदी घालण्यापेक्षा त्यांना संविधानाच्या चौकटीत आणावे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, काँग्रेस यावर भूमिका स्पष्ट करत नाही. म्हणूनच आमच्यातील निवडणुकीबाबतची बोलणी पुढे सरकत नाहीत, अशी भूमिका भारिप नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली. पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


आंबेडकर म्हणाले, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होणार नाहीत. कारण लोकसभा निवडणूक मोदींना त्यांच्या प्रतिमेवर जिंकायची आहे. विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबत घेतल्यास, विविध राज्यातील नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीला बसू शकतो. ही भीती भाजपला सतावत आहे. त्यामुळेच ते दोन्ही निवडणुका एकत्र घेणार नाहीत, असे आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा - मनसेचे अजूनही तळ्यात मळ्यात; आगामी निवडणुकीबाबत निर्णय नाही, राज ठाकरेंची भूमिका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याविषयी आग्रही असल्याचेही यावेळी आंबेडकरांनी सांगितले. पण, आरएसएसच्या बंदीच्या कल्पनेला त्यांनी विरोध केला. काँग्रेस आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याविषयी सकारात्मक नाही, असे सांगून आंबेडकरांनी काँग्रेसली कैचीत पकडले आहे. यावेळी प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाविषयीही त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांची ही वेळ चुकल्याचे आंबेडकर म्हणाले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES