• A
  • A
  • A
पालघरमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात, चालकासह ४ विद्यार्थी गंभीर

पालघर - जिल्ह्यातील सर जे.पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला पानेरीजवळ भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडयला जाणारी स्कूल बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात ४ विद्यार्थी आणि बसचा चालक गंभीर जखमी असून १५ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा उपरुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा -देवखोपमध्ये शेतकऱ्याच्या घराला आग, मालमत्तेचे नुकसान
भरधाव चाललेल्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस झाडाला आदळल्याने हा अपघात झाल्याच प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी याच शाळेची एक सहा चाकी बस तब्बल २५ किलोमीटर ५ चाकांवर चालली होती. मात्र, शाळा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -मनसेच्यावतीने बोईसर येथे ५०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.