• A
  • A
  • A
देवखोपमध्ये शेतकऱ्याच्या घराला आग, मालमत्तेचे नुकसान

पालघर - जिल्ह्यातील देवखोप गडग पाडा येथील शेतकरी तान्या रमेश पऱ्हाड यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत त्यांचे घर संपूर्णतः जळून खाक झाले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पऱ्हाड यांनी घरात ठेवलेल्या रोख रकमेसह जीवनावश्यक वस्तू आगीत भस्मसात झाल्या.


पऱ्हाड आपल्या कुटुंबियांसह पालघर येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरात अचानक आग लागली. या आगीत घरात असलेल्या गॅस सिलेंडरने पेट घेतला व स्फोट होऊन मोठी आग भडकली. शेजाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग इतकी पसरली की पऱ्हाड यांचे घर समानसह पूर्णतः जाळून खाक झाले.

वाचा- सोमवारी मायावती अन् शनिवारी शरद पवार पंतप्रधान, तर देश रविवारी सुट्टीवर - शाह
या आगीत पऱ्हाड यांनी घरात ठेवलेल्या रोख रकमेसह तांदूळ, गहू तसेच जीवनावश्यक वस्तू आगीत भस्मसात झाल्या. प्रचंड नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES