• A
  • A
  • A
मनसेच्यावतीने बोईसर येथे ५०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

पालघर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज बोईसर येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. या सामूहिक विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील तब्बल ५०० जोडपी एकाच वेळी विवाह बंधनात अडकली.


बोईसर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला पालघर वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. पालघर जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल आणि गरजू लोकांना आपल्या घरी विवाह करणे शक्य नसल्याने या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जिल्ह्यातील ५०० जोडप्यांचा विवाह संपन्न झाला.
हेही वाचा - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाडामधील पुतळ्याचे अनावरण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात एका जोडप्याचे कन्यादानही केले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने विवाह बंधनात अडकलेल्या सर्व जोडप्यांना संसारासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंच्या हस्ते मोखाडा येथे पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES