• A
  • A
  • A
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाडामधील पुतळ्याचे अनावरण

पालघर - वाडा येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भारतातील पहिल्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.


हेही वाचा-आदित्य ठाकरेंच्या हस्ते मोखाडा येथे पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वयाच्या ९३व्या वर्षी १६ ऑगस्ट २०१८ ला निधन झाले होते. त्यांच्या शोकसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात त्यांचे स्मारक बांधले जाईल, असे सांगितले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी वाडा येथे वाजपेयींच्या पुतळ्याचे अनावरण केले. ६.२ फूट उंचीचा हा पुतळा असून राजस्थानमधील किसनगड येथील ब्लॅक ग्रॅनाईट, मकराना, मार्बल यांचा वापर करून हा पुतळा बनवण्यात आला. तसेच छज्जा ढोलपुरी दगडचाही यामध्ये वापर करण्यात आला आहे. हा पुतळा राजस्थान येथील मूर्तिकार कैलास अग्रवाल यांनी बनवला आहे.
या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विष्णु सावरा, खासदार कपिल पाटील, राजेंद्र गावित, आमदार भास्कर धनारे, श्रमजीवी संघटनेचे प्रमुख विवेक पंडित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा-आदित्य ठाकरेंनी केली पालघरमधील भूकंप पीडित भागाची पाहणीCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES