• A
  • A
  • A
आदित्य ठाकरेंच्या हस्ते मोखाडा येथे पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन

पालघर - जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तरीही आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. ही पायपीट थांबावी म्हणून शिवसेना व युवासेनेतर्फे मोखाड्यातील टंचाईग्रस्त गाव पाड्यांमध्ये पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. या पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.


मोखाड्यात सध्यस्थितीत ५ गावे आणि ११ पाड्यांना ७ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, विहिरी गाव-पाड्यांपासून बहुतांश ठिकाणी एक किलोमीटरच्या अंतरावर आहेत. त्यामुळे आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पायपीट थांबावी म्हणून शिवसेना व युवासेनेने तालुक्यातील किनिस्ते, गवरचरीपाडा, विकासवाडी, सोनारवाडी, चास हट्टीपाडा यासह अन्य ठिकाणी ३ हजार लीटर क्षमतेच्या १८ पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंनी केली पालघरमधील भूकंप पीडित भागाची पाहणी
मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावातील नागरिकांना शुध्द आणि मुबलक पाणी देण्याचे निवडणुकीच्या वचननाम्यात शिसेनेने जाहीर केले होते. येथील पाझर तलावाचे खोलीकरण, रुंदीकरणासह तलावातील गाळ काढणे, नवीन एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, पाईपलाईन आणि जलशुध्दीकरण केंद्राच्या नुतनीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
हेही वाचा - पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा; युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
यावेळी आदित्य ठाकरे यांना नळयोजना मंजूर करा, अशी मागणी किनिस्ते येथे आदिवासी महिलांनी केली. त्यावेळी आता गावात पाणी आणले आहे. पुढे घरा - घरात पाणी पोहोचवणार असल्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी येथील महिलांना दिले आहे. तर चास-हट्टीपाडा येथे ठाकरे यांनी थेट आदिवासी महिलांशी सवांद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवसेना सत्तेत असो वा नसो, आदिवासींची सेवा करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, पालघर जिल्हा समन्वयक श्रीनिवास वनगा, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, तालुका प्रमुख अमोल पाटील, मोखाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मंगलाताई चौधरी यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES