• A
  • A
  • A
आदित्य ठाकरेंनी केली पालघरमधील भूकंप पीडित भागाची पाहणी

पालघर - डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सार्वजनीक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या भागाची पाहणी केली.


आदित्य ठाकरे यांनी भूकंपामुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. तसेच, यासंबंधी माहीती घेतली. भूकंपाचा धक्का लागल्यानंतर घाबरून पळत असताना दोन वर्षीय वैभवी भुयाळ या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. तिच्या घरी जाऊन ठाकरे यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. भूकंपग्रस्त भागातील नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून त्यांना त्वरित मदत द्यायला हवी. तसेच, सरकार कमी पडेल तिथे शिवसेना असेल, असे ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना - भाजप युतीबाबत विचारले असता, राजकीय भूकंप नंतर, असे सांगत ठाकरेंनी काढता पाय घेतला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES