• A
  • A
  • A
पालघरमध्ये भीषण अपघात, ट्रकखाली चिरडल्याने २ तरुणांचा मृत्यू

पालघर - जिल्ह्यातील एका भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले आहेत. अपघात इतका भीषण होता, की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. आज सायंकाळी हा हादरवणारा अपघात घडला.


वाचा - जनता कॉलेजच्या चौकात अपघात, भिकाऱ्याचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार पालघर माहीम रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या मधोमध दुभाजक (डीवायडर) उभारण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. आज सायंकाळी माहीम रस्त्यावरून दुचाकीवर २ तरुण जात होते. या रस्त्यावरून त्यांचे वाहन सरकले.

तोल गेल्याने हे दोन्ही तरुण बाजूने जाणाऱ्या ट्रकखाली आले. दोन्ही तरुण ट्रकमागील चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एकाची ओळख पटली असून त्याचे नाव टिनू उर्फ सुरेश गामीत असून तो मोहोपाडा येथील रहिवासी आहे, तर दुसऱ्याची ओळख अजूनही पटलेली नाही.

वाचा - औसा-तुळजापूर रस्त्यावर जीप-टँकरचा अपघात; २ ठार, ७ जखमी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES