• A
  • A
  • A
ट्रिपल सीट दुचाकी पुलावरून कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, २ जखमी

पालघर - वाणगाव-डहाणू रस्त्यावर दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर, २ विद्यार्थी जखमी झाले आहेत. उपदेश मदन माच्ची (वय १७), असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.


वाणगाव येथील जे.एम.टी हायस्कूलच्या दहावी इयत्तेतील शिकणारे हे ३ विद्यार्थी, आपल्या शाळेतील दहावीचा निरोप समारंभ संपल्यावर डहाणू बीचवर फिरायला जात होते. तीनही विद्यार्थी हे दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना चंडीगावजवळ त्यांची दुचाकी पुलाखाली पडल्यामुळे हा अपघात झाला.
हेही वाचा -पालघर भूकंप : प्रशासन मदतीसाठी तत्पर, नागरिकांनी सहकार्य करावे
या अपघातात उपदेश मदन माच्ची (वय १७) या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अजित काशीनाथ मोरे (वय १६ ) दुर्गेश माछी (वय १६ ) हे दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. तीनही विद्यार्थी डहाणू येथील कासपाडा, देहने-फळे येथील रहिवासी आहेत. जखमींना सिल्वासा येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -पालघर भूकंप: एनडीआरएफची दोन पथके दाखल, नागरिकांमध्ये करणार जनजागृती

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES