• A
  • A
  • A
पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा; युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पालघर - महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने बहुतांश जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. पालघर जिल्ह्यातही गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी युवासेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मार्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये तरुण-तरुणींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


हेही वाचा - पालघर भूकंप : प्रशासन मदतीसाठी तत्पर, नागरिकांनी सहकार्य करावे
मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्ह्यातही गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तरीदेखील शासनामार्फत फक्त काही गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी काही प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी व विक्रमगड या ३ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या ३ तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यातही दुष्काळीची परिस्थिती आहे. येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पालघर जिल्ह्यात शासनाने केलेल्या पाहणीत, या तालुक्यांमध्येही शेतकऱ्यांचे पीक ५०% हून कमी असल्याचे दिसले आहे. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, मागणीसाठी युवासेनेतर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा - पालघर भूकंप: एनडीआरएफची दोन पथके दाखल, नागरिकांमध्ये करणार जनजागृती
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात जिल्हाध्यक्ष राजेश शहा, जगदीश धोडी, वसंत चव्हाण, केतन पाटील, महाराष्ट्र राज्य सहसचिव युवासेना परीक्षित पाटील, पालघर जिल्हा युवासेना विस्तारक राहुल लोंढे, जिल्हा युवा अधिकारी जश्विन घरत, पालघर शहर युवा अधिकारी निमिश पाटील, जितेंद्र पामाळे आदी पदाधिकाऱ्यांसह युवासेना- युवतीसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा - ओएनजीसी सर्वेक्षणाविरोधात मच्छीमारांचे आंदोलन, नुकसान भरपाईची मागणी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES