• A
  • A
  • A
पालघर भूकंप : प्रशासन मदतीसाठी तत्पर, नागरिकांनी सहकार्य करावे

पालघर - सह्याद्री अतिथीगृह येथे पालघर जिल्ह्यातील भूकंपासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. डहाणू, तलासरी आदी भूकंपप्रवण भागातील नागरिकांनी भूकंपामुळे घाबरुन जाऊ नये, प्रशासन आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असून आपत्कालीन स्थितीत प्रशासनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी केले.


सवरा यावेळी म्हणाले, की शासनाने भूकंपासंदर्भात गंभीर दखल घेतली असून सावधानतेबाबत काळजी घेण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. भूकंपासंदर्भातील विविध तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून सावधानतेबाबत काय दक्षता घ्यावी याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार शासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जातील. भूकंपग्रस्त भागात जनजागृती करुन लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे आवाहन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले.
आयआयटी, मुंबईचे भूकंप तज्ज्ञ प्रा. डॉ. रवी सिन्हा तसेच डी. श्रीनागेश, हवामान अंदाज विभागाचे अधिकारी यांनी भूकंपासंदर्भातील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. या परिसरातील भूकंप हा स्वॉर्म (Swarms) सौम्य कंपनाची शृंखला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे दक्षता घेणे आवश्यक असून पालघर येथे कायमस्वरुपी भूमापन केंद्र स्थापन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-पालघर भूकंप: एनडीआरएफची दोन पथके दाखल, नागरिकांमध्ये करणार जनजागृती
जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी विविध उपाययोजनांची माहिती या बैठकीत दिली. यामध्ये प्रामुख्याने जनजागृती शिबिरे, प्रसारमाध्यमांद्वारे जागृती, तात्पुरती निवास व्यवस्था, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, सतर्कतेच्या सूचना, महावितरण, पोलीस, नागरी सुरक्षा दल, राष्ट्रीय आपती निवारण दल आदी विभागांनी करावयाची कामे तसेच पालघर जिल्ह्यातील मोठे प्रकल्प गेल, भाभा, तारापूर, रिलांयन्स, जलप्रकल्प यांनी घ्यावयाची काळजी, भूकंपग्रस्त गावातील घरांचे सर्वेक्षण, सावधगिरीसंदर्भात सूचना, आसपासच्या भागातील रुग्णालये, वाहतूक, रस्ते आदींबाबत न तज्ज्ञांच्या मदतीने सावधगिरीच्या उपाययोजना करत असल्याचेही नारनवरे यांनी सांगितले.
हेही वाचा-भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन खडबडून जागे; एनडीआरएफसह आरोग्य पथक दाखल
यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, नागरी संरक्षण दलाचे महानिदेशक संजय पांडे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, आयआयटी, मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. रवी सिन्हा, राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान हैद्राबादचे अधिकारी डी. श्रीनागेश, राज्य आपत्ती निवारण कक्षाचे संचालक दौलत देसाई आदी उपस्थित होते. या बैठकीस पोलीस, सार्वजनिक बांधकाम, महसूल, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES