• A
  • A
  • A
पालघर भूकंप: एनडीआरएफची दोन पथके दाखल, नागरिकांमध्ये करणार जनजागृती

पालघर - जिल्ह्यात गेल्या ३ महिन्यांपासून भूकंपाचे सत्र सुरुच आहे. काल दिवसभरात भूकंपाच्या ६ धक्क्यांनी पालघर जिल्हा हादरला. भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या एका चिमुरडीचा मृत्यू झाला. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची दोन पथके पालघरमध्ये पोहोचली आहेत.

पालघरमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.


भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना भूकंपानंतरच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे, याचे प्रात्यक्षिक नागरिकांना एनडीआरएफकडून देण्यात येणार आहेत. एनडीआरएफने सोबत २०० टेंट आणि आपत्ती व्यवस्थापनाची सर्व साधने आणली आहेत.
हेही वाचा - भूकंपाच्या धक्क्याने भयभीत होऊन पळताना पडल्याने २ वर्षीय मुलीचा मृत्यू
काल झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनंतर बरेचशी कुटुंबे भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे घरात राहायला तयार नसलेल्या, कुटुंबांना टेंटमध्ये राहण्याची सोय एनडीआरएफकडून केली जात आहे. तसेच ४० जवानांच्या दोन तुकड्या नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत. मोठा भूकंप झालाच तर न घाबरता त्याला कसे सामोरे, जावे याचे प्रात्यक्षिक नागरिकांना दिले जात आहे.
हेही वाचा - डहाणू-तलासरी भागात एकाच दिवशी ३ वेळा भूकंपाचे धक्के

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES