• A
  • A
  • A
ओएनजीसी सर्वेक्षणाविरोधात मच्छीमारांचे आंदोलन, नुकसान भरपाईची मागणी

पालघर - ओएनजीसीमार्फत समुद्रात सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यांच्या नुकसान भरपाईबाबत शासनस्तरावरून कुठल्याही हालचाली होत नसल्याच्या निषेधार्थ वसई आणि डहाणू भागातील शेकडो मच्छीमार बोटींनी सर्वेक्षण बोटीला घेराव घातला. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.


हेही वाचा - सहाव्या रांगेतून थेट पहिल्या रांगेत.., नरमलेल्या भाजपने केलं राहुल गांधींचं प्रमोशन?

ओएनजीसी कंपनीकडून १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी असा ५६ दिवसांचा समुद्राच्या भूगर्भातील तेल आणि वायू शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करण्यापूर्वी ३ महिन्याआधी ओएनजीसीने मच्छीमार प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या समितीची बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र, समिती अथवा कुठल्याही मच्छीमार संघटना, सहकारी संस्थांना साधे विचारलेही जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमारांनी शुक्रवारी आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षण जहाजाला घेराव घालत निषेध केला.

हेही वाचा - विविध प्रलंबित मागण्यासाठी मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वसईच्या समुद्रात १५ ते २० नॉटिकल मैलावर हे सर्वेक्षण सुरू असल्याने वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील शेकडो मच्छीमार पुरुष-महिलानी किनाऱ्यावर हातात काळे झेंडे घेऊन जोरदार निषेध केला. एडवण, केळवे, टेम्भी, वडराई, सातपाटी आदी किनारपट्टीवरील मच्छीमारांनी पालघर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, मच्छीमार कृती समितीच्या ज्योती मेहेर, राजन मेहेर, हर्षदा तरे आदींसह शेकडो महिलांचा सहभाग असलेल्या मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले

हेही वाचा - 'त्या' प्रामाणिक होमगार्डने साईभक्ताला परत केले ११ हजार रुपयासह २ मोबाईल

जिल्हाधिकारी कार्यालयावर १४ जानेवारीला काढण्यात आलेल्या मोर्च्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर-डहाणू आणि वसई-उत्तनच्या मच्छीमारामध्ये हद्दीवरून सुरू असलेल्या संघर्षाबाबत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १० दिवसाचा कालावधी उलटून गेल्या तरीही बैठकीचे आयोजन करण्यात न आल्याने संतप्त मच्छीमारांनी सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांना धारेवर धरले. आपण जिल्हाधिकाऱ्यांशी ह्या विषयावर चर्चा करून येत्या ८ दिवसात बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले. ८ दिवसाच्या आत बैठकीचे आयोजन न केल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES