• A
  • A
  • A
भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन खडबडून जागे; एनडीआरएफसह आरोग्य पथक दाखल

पालघर - जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सर्व संबंधित विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफसह आरोग्य पथक भूकंपप्रवण क्षेत्रात दाखल झाले आहे.



गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. डहाणू-तलासरी भागातील घरांना तडे गेले असून काही घरांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी १५० तंबू निर्माणासाठी सामान आणण्यात आले आहे. यासाठी ४२ ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा - भूकंपाच्या धक्क्याने भयभीत होऊन पळताना पडल्याने २ वर्षीय मुलीचा मृत्यू
शुक्रवारी पहाटे ६ वाजून ५८ मिनिटांनी ३.३ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसला. त्यानंतर सकाळी १० वाजून ३ मिनटांनी ३.५ रिश्टरचा, १० वाजून २९ मिनिटांनी ३.० रिश्टरचा, दुपारी ०२ वाजून ६ मिनिटांनी ४.१ रिश्टरचा तर, अखेरचा ३.६ रिश्टर तीव्रतेचा धक्का ३ वाजून ५२ मिनिटांनी बसला. डहाणू-तलासरी तालुक्यातील तसेच डहाणू तालुक्यातील झाई, बोर्डी, डहाणू, धाकटी डहाणू, वाणगाव, दापचरी, धुंदलवाडी, सास्वंद, बहारे, आंबेसरी, गांगणगाव, आंबोली, रानशेत, कासा, चारोटी भागात हे भूकंपाचे बसले आहेत.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES