• A
  • A
  • A
'वर्षाला ६ हजार' ही शेतकऱ्यांची थट्टा - अर्थतज्ज्ञ विनोद चंद

वसई - 'केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. तो येणाऱ्या निवडणुकीला ग्राह्य धरून बनविला आहे. यामध्ये सर्वात मोठी थट्टा शेतकऱ्यांची केली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याचे ठरवले आहे. आजच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना महिन्याला ५०० रुपयांमध्ये त्यांचा खर्च चालवावा लागणार आहे,' अशी प्रतिक्रिया मिरारोड येथे राहणारे अर्थतज्ज्ञ आणि व्यावसायिक विनोद चंद यांनी अर्थसंकल्पावर व्यक्त केली.


हेही वाचा -भूकंपाच्या धक्क्याने भयभीत होऊन पळताना पडल्याने २ वर्षीय मुलीचा मृत्यू
'आज सादर झालेला अर्थसंकल्प आगामी निवडणुकीला समोर ठेऊन बनविले आहे. पाच लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकर माफ केला आहे. जेटली विरोधी पक्षात होते, तेव्हा पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील प्राप्तिकर माफ करण्यासंबंधी बोलत होते. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर तब्बल ५८ महिन्यानंतर हा निर्णय घेतला. त्यामुळे हा निर्णय हा निवडणूका समोर ठेवून घेतला आहे, असे नागरिकांना वाटणे साहजिक आहे. या अर्थसंकल्पात छोट्या उद्योगाला , कंपन्यांना फायदा होईल असे काहीही विशेष नाही,' असे ते म्हणाले.

हेही वाचा -डहाणू-तलासरी भागात दिवसभरात भूकंपाचे ६ धक्के
'अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तब्बल ७५ हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली. या मदतीचा देशातील तब्बल १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यावेळी ग्रामीण भागातील विविध योजनांसह शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आता वर्षाला ६ हजार रुपयांची मदत उत्पादन सहाय्य म्हणून देण्याची घोषणा केली आहे. ही शेतकऱ्यांची केलेली थट्टा असून अशाप्रकारची थट्टा करणे सरकारला शोभत नाही. याऐवजी शासनाने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सर्वच मालाला योग्य हमीभाव देत तो सर्व माल खरेदी केला, तर शेतकऱ्यांना ते ६ हजार देण्याची गरजच उरणार नाही,' असे ते म्हणाले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES