• A
  • A
  • A
भूकंपाच्या धक्क्याने भयभीत होऊन पळताना पडल्याने २ वर्षीय मुलीचा मृत्यू

पालघर - जिह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील काही भागात आज पहाटेपासून भूकंपाचे ६ धक्के बसले आहेत. या भूकंपाच्या धक्याने भयभीत होऊन पळताना तलासरी हळदपाडा येथील २ वर्षीय वैभवी भुयाळ ही पळत असताना पडल्यामुळे तिला दुखापत झाली. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


या सहामध्ये ४.१ रिश्टर स्केलचा सर्वात जास्त तीव्रतेचा धक्का असल्याची माहिती पालघर जिल्हा आप्पती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. यामुळे डहाणू-तलासरी भागातील घरांना तडे गेले असून काही घरांचे नुकसान झाले आहे. एकाच दिवसात बसलेल्या ६ भूकंपाच्या धक्क्यांमुळे पुन्हा एकदा परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
हेही वाचा- डहाणू-तलासरी भागात दिवसभरात भूकंपाचे ६ धक्के

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES