• A
  • A
  • A
डहाणू-तलासरी भागात दिवसभरात भूकंपाचे ६ धक्के

पालघर - डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात आज पहाटेपासून भूकंपाचे ६ धक्के बसले आहेत. यातील सर्वाधिक तीव्रतेचा धक्का ४.१ रिश्टरचा असल्याची माहिती पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. यामुळे डहाणू-तलासरी भागातील घरांना तडे गेले असून काही घरांचे नुकसान झाले आहे.


हेही वाचा - लंगोटही बांधू, अंगाला तेलही लावू आणि जिंकूही; गिरीश महाजन यांचा सेनेला टोला

एकाच दिवसात बसलेल्या ५ या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पुन्हा एकदा परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. पहाटे ६ वाजून ५८ मिनिटांना सर्वात आधी ३.३ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसला. त्यानंतर सकाळी १०.०३ वाजता ३.५ रिश्टरचा, १० वाजून २९ मिनिटांनी ३.० रिश्टरचा, दुपारी ०२ वाजून ६ मिनिटांनी ४.१ रिश्टरचा तर अखेरचा धक्का ३ वाजून ५२ मिनिटांनी ३.६ रिश्टर तीव्रतेचा सौम्य धक्का बसला.

हेही वाचा - डहाणू-तलासरी भागाला पुन्हा भूकंपाचा धक्का, ३.४ रिश्टर स्केल नोंद

डहाणू-तलासरी तालुक्यातील डहाणू तालुक्यातील झाई, बोर्डी, डहाणू, धाकटी डहाणू, वाणगाव, दापचरी, धुंदलवाडी, सास्वंद, बहारे, आंबेसरी, गांगणगाव, आंबोली, रानशेत, कासा, चारोटी भागात हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे समजते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES