• A
  • A
  • A
डहाणू-तलासरी भागात एकाच दिवशी ३ वेळा भूकंपाचे धक्के

पालघर - जिह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील काही भागात आज पहाटेपासून भूकंपाचे ३ धक्के बसले आहेत. यातील सर्वाधिक तीव्रतेचा धक्का ३.५ रिश्टर स्केलचा असल्याची माहिती पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एकाच दिवसात बसलेल्या ३ या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पुन्हा एकदा परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र


आज पहाटे ०६.५८, सकाळी १०.०३ व १०.२९ वाजताच्या सुमारस अनुक्रमे ३.३, ३.५ व ३.० रिश्टर स्केलचे भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. डहाणू-तलासरी तालुक्यातील आसपासच्या परिसरातील डहाणू तालुक्यातील झाई, बोर्डी, डहाणू, धाकटी डहाणू, वाणगाव, दापचरी, धुंदलवाडी, सास्वंद, बहारे, आंबेसरी, गांगणगाव, आंबोली, रानशेत, कासा, चारोटी भागात हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे समजते. सतत बसणारे या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - मुंबई-गुजरात महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES