• A
  • A
  • A
मुंबईतल्या सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करून श्वेत पत्रिका काढा - शरद पवार

मुंबई - शहरात वारंवार होणारे रेल्वेचे अपघात, पूल कोसळण्याच्या दुर्घटना अतिशय चिंताजनक आहेत. मुंबई परिसरातल्या सर्व पुलांचे ऑडिट करून त्याची श्वेतपत्रिका काढावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे . छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.


अपघातग्रस्त पुलाचे ऑडिट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मग अपघात कसा झाला? खरंच या पुलाचे ऑडिट झाले आहे का? असे प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केले. मध्य रेल्वेने २०१५ साली राज्य सरकारला पत्र लिहले होते. यामध्ये मुंबईतल्या फूटओव्हर ब्रिजची माहिती देण्यात आली होती. याकडे सरकारने दुर्लक्ष केले का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता रेल्वेवरील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करून राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी, असे ते म्हणाले.
हेही वाचा - CSMT पूल दुर्घटना: दोन अभियंते निलंबित, कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस
मुंबई समुद्र किनाऱ्यावरील शहर आहे. वातावरणाचा धातूच्या बांधकामावर विपरीत परिणाम होत असतो. परदेशात लोखंडावर काही विशिष्ट सोल्युशन लावण्यात येते. मात्र, आपल्याकडे तशी उपाययोजना होता नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर नाशिक ते अहमदाबाद मार्गावरील कोपरी जवळील पूल धोकादायक असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोपरी पुलाच्या खालील गांजलेले लोखंडाचे गर्डरचे फोटोही दाखवले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES