• A
  • A
  • A
नागपूरातून नाना पटोले गडकरींविरोधात निवडून येणार नाहीत - प्रकाश आंबेडकर

मुंबई - नागपूरातून नाना पटोले गडकरींविरोधात निवडून येणार नाहीत हे काँग्रेसला माहिती आहे. तरी मुद्दाम त्या जागेवरून काँग्रेस नानांना लढवत आहे, ही काँग्रेसची फिक्सिंग असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यावेळी दादर येथील पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे आरोप केले.


प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची नावे त्यांच्या जातनिहाय जाहीर केली. त्यावेळी ते म्हणाले, आम्ही सर्व वंचित घटकांना संधी दिली आहे. यात धनगर, माळी, कुणबी, मराठा, बौद्ध, मांग आणि आत्तापर्यत ज्या वर्गाला कोणी उमेदवारी दिलेली नव्हती त्या वडार, कैकाडी या समाजालाही उमेदवारी दिली आहे. हा सर्व समाज भाजप आणि शिवसेनेचा मतदार होता, आता त्यांना स्वतःच्या हक्काची आघाडी भेटल्याने ते आपल्या उमेदवारांना मते देतील. या सगळ्याचा सर्वात मोठा फटका सेना-भाजपला बसेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

राज्यात अनेक जुने राजकारणी हे अंगात देवी आल्याप्रमाणे निवडणूक काळात उठून बसतात. नवीन पर्याय आणि तरुण राजकारणात समोर आले पाहिजे. मात्र, काही पक्षांकडून जनाधार नसलेल्या लोकांना उभे केले जात आहे. मात्र, आम्ही वंचित जाती समूहातील लोकांना उमेदवारी देऊन एक नवा पायंडा पाडत आहोत. आम्ही सर्वाधिक जागा धनगर आणि माळी समाजाला दिल्या असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES