• A
  • A
  • A
बुलेट ट्रेनची गरज काय? रेल्वेच्या पायाभूत सुविधा द्या - शरद पवार

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ पादचाऱ्यांना हकनाक जीव गमवावा लागला. या घटनेचे तीव्र राजकीय पडसाद उमटत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. बुलेट ट्रेनची गरज काय ? आधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा उभारा, असा सल्ला त्यांनी राज्यकर्त्यांना दिल्या. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .


पूल दुर्घटनेविषयी बोलताना पवार यांनी सांगितले, मुंबईमध्ये विरार ते चर्चगेट आणि कर्जत ते सीएसएमटी या मार्गावर १ कोटी लोक प्रवास करतात यात वेगवेगळे अपघात होतात, त्या अपघातात रोज १५ ते २० अपघात होतात आणि वर्षाला २५०० ते ३००० लोकांचा मृत्यू होतो, तर महिन्याला १ ते २ हजार जखमी होतात. ही अतिशय चिंतेची बाब आहे. रेल्वे प्रशासन , राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे .
बुलेट ट्रेनवर सव्वा लाख कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा आता रेल्वेच्या पायाभूत सुविधा उभारणे अतिशय गरजेचे आहे, असेही पवार यांनी सांगितले. मुंबईत झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून प्रशासनाने याची गांभीर्याने दाखल घेतली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES