• A
  • A
  • A
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवारच लोकसभेच्या रिंगणात

मुंबई - राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पार्थ पवार मावळमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्याचबरोबर अमोल कोल्हे, समीर भुजबळ, धनराज महाले आणि बजरंग सोनवणे यांनाही लोकसभा उमेदवारी देण्यात आली आहे.


दुसऱ्या यादीत एकूण पाच जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरूरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनवणे आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा - भाजप-सेना युती म्हणजे फेव्हीकॉलचा मजबूत जोड; तुटणार नाही - मुख्यमंत्री
आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा होत असून त्यांनतर उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली. मात्र, माढा मतदार संघाबाबत ते अधिक बोलले नाहीत. माढाच्या जागेबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा अद्याप सुरू आहे. अतिशय चांगला उमेदवार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवारांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनतर स्थानिक नेत्यांशी सल्लामसलत करून माढासाठी नाव जाहीर केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'शरद पवारांना फक्त शिवसेना-भाजपात घेऊ नका, मग आम्ही टीका करायची कोणावर ?'
माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा पक्षात आहे. मात्र, तेथे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पसंती दिली जाईल की काय? अशी भीती मोहिते पाटील यांना आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचा अग्रह धरला आहे.
हेही वाचा - बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, पवारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले
वादग्रस्त नगरच्या जागेवरही पक्षात एकमत झालेले दिसत नाही. बीडमधून अमरसिंह पंडित यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, बजरंग सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. सोनवणे यांचे नाव यादीत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुरुवारी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात जागा वाटपावरून स्वाभिमानी-काँग्रेस नेत्यांची बैठक
पहिल्या यादीतील उमेदवारीची नावे आणि मतदारसंघ -

ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील
बारामती - सुप्रिया सुळे
बुलडाणा - राजेंद्र शिंगणे
सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले
कोल्हापूर धनंजय महाडिक
जळगाव - गुलाबराव देवकर
रायगड - सुनील तटकरे
ठाणे - आनंद परांजपे
कल्याण - बाबाजी पाटील
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES