• A
  • A
  • A
पालिका आणि रेल्वे प्रशासनाचे एकमेकांकडे बोट; पुलाची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न

मुंबई - गेल्या वर्षी अंधेरी येथील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर सीएसएमटीच्या दुर्घटनाग्रस्त पुलाचे पालिकेकडून ऑडिट करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी केवळ किरकोळ डागडुजी करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आज पूल कोसळल्यावर पुन्हा एकदा रेल्वे आणि पालिका प्रशासन कोणतीही नैतिक जबाबदारी न स्वीकारता एकमेकांकडे बोट दाखवत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १९८४ ला रेल्वेने त्यांच्या हद्दीत कल्याणच्या दिशेला पादचारी पूल बांधला. तर १९९० साली पालिकेने या पुलाचा पुढपर्यंत विस्तार केला. सदर पूल आमच्या हद्दीत नसून पालिकेच्या हद्दीत आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी सर्वस्वी पालिकेची असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर नुकतेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, सदर पुल रेल्वेचाच आहे. मनपा केवळ या पुलाची देखरेख करते. आम्ही दुरुस्तीसाठी परवानगी मागितली होती. मात्र, रेल्वेने परवानगी दिली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES