LATEST NEWS:
मुंबई - भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये संभ्रमावस्था असतानाही भाजपकडून युतीसाठी आग्रही भूमिका घेतली जात आहे. युतीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीसाठी सकारात्मक असून लोकसभाच काय, पण विधानसभेतही भाजप-शिवसेनेनेचे सरकार स्थापन होईल, असा आशावाद भाजप नेते आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी "समर्पण दिवस" म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.