• A
  • A
  • A
हार्बरवरची लोकल सेवा पुन्हा सुरू; २० गाड्या रद्द, तर ८० लोकल धावणार उशिराने

मुंबई - हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकातील ट्रान्सफॉर्मरला आज संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी ऐन वर्दळीच्या वेळी संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. मात्र, तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर पुन्हा लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.


हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानाजवळील ज्ञानेश्वरी बंगल्याला आग
सीएसएमटीहून पनवेलच्या दिशेने जाणारी लोकलसेवा प्रभावित झाली होती. यामुळे ऐन संध्याकाळी परतीच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी रुळावर उतरून पायी प्रवास सुरू केला होता. दुरूस्ती केल्यानंतर लोकल परत पूर्ववत करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे २० लोकल रद्द करण्यात आल्या असून ८० लोकल उशिराने धावणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

हेही वाचा -मुंबई विद्यापीठाचा प्रताप; परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना दाखवले गैरहजर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.