• A
  • A
  • A
लोकसभेच्या प्रचारासाठी भाजप सज्ज; कार्यकर्त्यांकडून घेणार ५० रुपये पक्ष निधी

मुंबई - शिवसेना-भाजप युतीचे घोंगडे भिजत असले तरी भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराच्या कार्यक्रमांची आखणी केली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी पक्षाने 'समर्पण दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुनगंटीवारांनी कार्यकर्त्यांना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.


हेही वाचा - मुंबईत मुख्यमंत्र्याच्या शेजारच्या बंगल्याला लागली आग
मुनगंटीवार म्हणाले, की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म, मानवतावाद आणि अंत्योदयाचा विचार मांडला. त्यांचे विचार देशभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी ऊर्जास्त्रोत आहेत. सत्ता हे परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्योदयाच्या संकल्पनेप्रमाणे रांगेतील शेवटच्या माणसाच्या आनंदासाठी काम करत आहेत. सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन विकास करण्यास भाजप वचनबद्ध आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाची धोरणे राबवली पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
समर्पण दिवस या माध्यमातून मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना २०१९ च्या निवडणुकांचीही आठवण करून दिली. राज्यात मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यासाठी प्रचार यंत्रणा सज्ज झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
किमान ५० रुपये पक्ष निधी देणे आवश्यक-
नमो अॅपच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी ते बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाच्या निधीत किमान ५० रुपये आर्थिक योगदान करणे आवश्यक असेल. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः समर्पण करुन या मोहीमेचा शुभारंभ करतील. आर्थिक समर्पण करुन सर्वांनी याचे ट्वीट करायचे आहे.
हेही वाचा - मुंबई विद्यापीठाचा प्रताप; परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना दाखवले गैरहजर
असा असेल मेरा परिवार, भाजप परिवार-
मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 'मेरा परिवार, भाजप परिवार' या उपक्रमाची सुरुवात करतील. मात्र, शाह मुंबईत येणार की नाही, याबाबतचा खुलासा भाजप प्रदेश कार्यालयाने केला नाही. 'मेरा परिवार, भाजप परिवार' हा कार्यक्रम १२ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत कार्यकर्त्यांनी राबवायचा आहे. भाजपच्या प्रत्येक सदस्याने घरावर भाजपचा झेंडा आणि स्टिकर लावायचे आहे. तसेच हॅशटॅग #MeraParivarBhajapaParivar या नावाने समाजमाध्यमात फेसबुकवर आणि ट्विटवरही या कार्यक्रमाचे प्रमोशन करायचे आहे.
याचबरोबर येत्या 26 फेब्रुवारीला कार्यकर्त्यांनी 'कमल ज्योती संपर्क' अभियानांतर्गत भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आणि सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरासमोर संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत दीपप्रज्वलन करायचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला 'संघटन संवाद' साधणार आहेत. देशभरातील बुथ प्रमुखांशी नमो अपच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी थेट संवाद साधणार आहेत.
हेही वाचा - देशात सध्या 'स्टेट टेरिरीजम' पसरत आहे - माजी न्यायमूर्ती एस. एस. पारकर
मार्च महिन्यात संकल्प गल्लीच्या माध्यमाने मंडळस्तरावर कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. मंडळ स्तरावर हे अभियान राबवण्यात येणार आहे. प्रत्येक बुथमधून किमान ५ जण दुचाकी घेऊन निघणार, असा हा कार्यक्रम आहे. भाजपचे झेंडे आणि मोदींचा मुखवटा घालून शहरात ३० ते ६० किमी तर ग्रामीण भागात तब्बल १५० किमी रॅली काढली जाणार आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES