• A
  • A
  • A
मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानाजवळील कर्मचारी निवासाला आग

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानाच्या काही अंतरावर असलेल्या एका कर्मचारी निवासाला आग लागल्याची घटना घडली. दुग्धमंत्री महादेव जानकर यांच्या बंगल्याला लागूनच कर्मचारी निवास आहे.


रात्री ९ च्या सुमारास ज्ञानेश्वरी बंगल्याशेजारी व ए. जी. बेल मार्गावर असलेल्या या कर्मचारी निवासाला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना पाऊण तासाच्या आत आग विझवण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर मधेच एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा - लोकसभेच्या प्रचारासाठी भाजप सज्ज; कार्यकर्त्यांकडून घेणार ५० रुपये पक्ष निधी
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन या आगीची पाहणी करून गेले. तर बाजूलाच राहणारे जानकर मात्र उशिरापर्यंत अजूनही फिरकले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- हार्बरवरची लोकल सेवा पुन्हा सुरू; २० गाड्या रद्द, तर ८० लोकल धावणार उशिराने


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES